बुधवार, २२ एप्रिल, २०२०

"छत्रपती शिवाजी महाराज - सीझर की जगज्जेता अलेक्झांडर"

"छत्रपती शिवाजी महाराज - सीझर की जगज्जेता अलेक्झांडर"


       सध्या लॉकडाउनमुळं शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भरपूर वेळ मिळतोय. उपलब्ध अस्सल ऐतिहासिक साधनांत 'पत्र' हे सर्वात Authentic समजलं जातं. एकूणच या ऐतिहासिक पत्रांचं वाचन करताना, फार्सी-मराठी कोशात शोध घेताना किंवा अगदी खरे जंत्री चाळताना खूपच चित्तवेधक गोष्टी समजू लागल्या आहेत. इतकं की ही पत्रं म्हणजे त्या काळच्या समाजमनाचा आरसाच आहेत असं म्हणणं वावगं ठरू नये.

       ईस्ट इंडीया कंपनीचे इंग्रज लोक भारतात व्यापार करताकरता इथल्या राजकीय घडामोडींवरही अतिशय बारीक लक्ष ठेऊन असत. त्यांची आज अशी भरपूर पत्रं उपलब्ध आहेत की ज्यामुळे तत्कालीन राजकीय परिस्थिती, सैन्य हालचाली, धर्मप्रसार, व्यापार, राजसत्तांमधील राजकारण वगैरे समजण्यास मदत होते.

       एकूणच डच, पोर्तुगीज, फ्रेंच आणि ब्रिटिशांमधे ब्रिटिशांनी लिहिलेली पत्रे अतिशय खात्रीलायक समजली जातात. ब्रिटिशांनी लिहिलेल्या पत्रांचा 'English Records on Shivaji' नावाचा एक ग्रंथच शिवचरित्र कार्यालय, पुणे यांनी १९३१ साली प्रकाशित केलाय.

       शिवाजी महाराजांचा एखादा समकालीन मित्र तर त्यांचं कर्तुत्व सांगेलच पण अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी आपल्या कट्टर शत्रूची तुलना सीझर वा अलेक्झांडर द ग्रेटशी करावी यातूनच महाराजांचं कर्तुत्व अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतं.

       ...'he came, he saw, he conquer' असं सीझरबद्दलचं एक वाक्य प्रसिद्ध आहे पण ब्रिटिश महाराजांची तुलना त्याच्याशी करताना काय म्हणतात तर 'he came, he saw and he overcame'. खरंतर प्रत्येक शब्द अगदी तोलून मापून वापरणाऱ्या इंग्रजांनी महाराजांच्या बाबतीत, आपल्या इंग्लंडमधील मुख्यालयाला एक भलंमोठं पत्रच पाठवलंय आणि पुढे दिलेलं संपूर्ण पत्र वाचल्याशिवाय तर ते नक्कीच समजणार नाही. काय बरोबर ना?

संदर्भ -

१) English Factory Records on Shivaji - 1659 to 1682.
२) शिवकालीन पत्र-सार-संग्रह, खंड २ - शंकर नारायण जोशी









1 टिप्पणी: