"कालगणना"
भाग तिसरा
क) ख्रिस्ती कालगणना
प्रत्येक वर्षी डिसेंबर महिना आला की बाजारात नवीन वर्षांच्या कॅलेंडरचे म्हणजेच दिनदर्शिकेचे पेवच फुटलेले दिसते. अशी कॅलेंडर्स ही ज्या भागात विकली जातात त्या भागातल्या भाषेप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे तयार केलेली दिसून येतात. ही कॅलेंडर्स पंचांगातल्या माहितीवर आधारित असतात. एकाच कॅलेंडरवर इंग्रजी महिने, मराठी महिने, सणवार, सूर्य, चंद्रग्रहणांच्या वेळा, देवदेवतांच्या जयंत्या, महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी वगैरेचा उल्लेख केलेला दिसून येतो. या बहूतेक दिसणार्या इसवीसनाच्या कॅलेंडरमधे आपण यापूर्वीच्या दोन भागात पाहिलेल्या विक्रम संवत, शालिवाहन शके आणि क्वचित प्रसंगी शिवराज्याभिषेक शके, हिजरी सन यांचा उल्लेख एकत्रितपणे केलेला दिसतो. अनेक धर्माच्या नववर्षांचा यात उल्लेख केलेला असतो. मराठी वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला, तेलगू वर्षाची म्हणजे उगादीची सुरुवात वैशाखात, मुस्लीम धर्माची सुरुवात मोहरमला तर ख्रिस्ती वर्षाची सुरुवात एक जानेवारीला होते. सध्या आपण नेहमीच्या वापरात याच ख्रिस्ती कालगणनेचा वापर करतो. या कालगणनेचा अभ्यास करायचा तर आपल्याला पार इजिप्त संस्कृतीपर्यंत मागे जावे लागेल. इजिप्त संस्कृतीनंतर बॅबोलियन संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती आणि सरतेशेवटी ख्रिस्ती संस्कृतीतून या कालगणनेची सुधारणा होत गेली. पैकी या लेखात आपण वर उल्लेखलेल्या काही संस्कृतीतील थोडीफार माहिती घेणार आहोत आणि सर्वात शेवटी सध्या जगमान्य असणार्या ग्रेगोरीयन कालगणनेची माहिती घेणार आहोत. इथे खाली दिलेल्या कालगणनांची माहिती आपण या लेखात करून घेणार आहोत.
१) इजिप्शीयन आणि बॅबोलियन कालगणना
२) ग्रीक कालगणना
३) रोमन कालगणना
४) ज्युलियन कालगणना
५) ग्रेगोरीयन कालगणना
क - १) इजिप्शीयन कालगणना आणि बॅबोलियन कालगणना -
इजिप्त संस्कृतीमध्ये त्यांच्या वर्षांची विभागणी तीन भागांत केलेली होती. त्यात आठवडय़ाचे दिवस दहा धरलेले होते पण नंतरच्या बॅबोलियन संस्कृती चंद्राशी म्हणजे चांद्रमानाशी संबंधित असल्याने त्यांनी वारांना त्यांच्या भाषेतील ग्रहांची नावे दिलेली होती.
बॅबोलियन संस्कृतीतील वारांची नावे -
रवि(वार) - राम्स
सोम(वार) - सिन
मंगळ(वार) - नरगल
बुध(वार) - नाबू
गुरू(वार) - मारदुक
शुक्र(वार) - इश्तार
शनि(वार) - निबिक
बॅबोलियन संस्कृतीतील वारांची नावे -
रवि(वार) - राम्स
सोम(वार) - सिन
मंगळ(वार) - नरगल
बुध(वार) - नाबू
गुरू(वार) - मारदुक
शुक्र(वार) - इश्तार
शनि(वार) - निबिक
क - २) ग्रीक कालगणना -
ग्रीक साम्राज्यात वर्षांचे एकूण महिने दहा धरले गेले होते व त्यांना त्यांच्या देवदेवतांची नावे दिली होती. त्यांचे वर्ष मार्च ते डिसेंबर असे होते.
ग्रीक संस्कृतीतील महिने(कंसात महिन्यांचे दिवस) -
१) मार्च - Mensis Martius (31)
२) एप्रिल - Mensis Aprilis (30)
३) मे - Mensis Maius (31)
४) जून - Mensis Iunius (30)
५) जुलै - Mensis Quinctilis (31)
६) ऑगस्ट - Mensis Sextilis (30)
७) सप्टेंबर - Mensis September (30)
८) ऑक्टोबर - Mensis October (31)
९) नोव्हेंबर - Mensis November (30)
१०) डिसेंबर - Mensis December (30)
एकूण दिवस - ३०४
ग्रीक संस्कृतीतील महिने(कंसात महिन्यांचे दिवस) -
१) मार्च - Mensis Martius (31)
२) एप्रिल - Mensis Aprilis (30)
३) मे - Mensis Maius (31)
४) जून - Mensis Iunius (30)
५) जुलै - Mensis Quinctilis (31)
६) ऑगस्ट - Mensis Sextilis (30)
७) सप्टेंबर - Mensis September (30)
८) ऑक्टोबर - Mensis October (31)
९) नोव्हेंबर - Mensis November (30)
१०) डिसेंबर - Mensis December (30)
एकूण दिवस - ३०४
क - ३) रोमन कालगणना -
पुढे रोम साम्राज्यात ग्रीक कालगणनेतल्या त्रुटी लक्षात आल्यावर त्यात शेवटच्या दोन महिन्यांची म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांची वाढ केली गेली. आता वर्ष बारा महिन्यांचे झाले होते पण नवीन वर्ष मार्च ते फेब्रुवारी असेच बनले. पहिला महिना मार्च होता, तर शेवटचा महिना फेब्रुवारी असा होता. अशा सर्व महिन्यांना रोमन देवदेवतांची व लॅटिन भाषेतील नावे दिली होती. पुढे हा क्रम बदलला गेला व तो बदलून जानेवारी ते डिसेंबर असा झाला पण लिप वर्षासाठी एक वाढीव महिना त्यात घातला गेला आणि महिन्यांच्या दिवसांचीही फेरआखणी केली गेली.
सुधारीत रोमन संस्कृतीतील महिने (कंसात महिन्याचे दिवस) -
१) जानेवारी - Mensis Ianuarius (29)
२) फेब्रुवारी - Mensis Februarius (29)
#) वाढीव महिना - Intercalaris Mensis (27)
३) मार्च - Mensis Martius (31)
४) एप्रिल - Mensis Aprilis (29)
५) मे - Mensis Maius (31)
६) जून - Mensis Iunius (29)
७) जुलै - Mensis Quinctilis (31)
८) ऑगस्ट - Mensis Sextilis (29)
९) सप्टेंबर - Mensis September (29)
१०) ऑक्टोबर - Mensis October (31)
११) नोव्हेंबर - Mensis November (29)
१२) डिसेंबर - Mensis December (29)
वर्षाचे एकूण दिवस - ३५५
लिप वर्षाचे एकूण दिवस - ३८२
सुधारीत रोमन संस्कृतीतील महिने (कंसात महिन्याचे दिवस) -
१) जानेवारी - Mensis Ianuarius (29)
२) फेब्रुवारी - Mensis Februarius (29)
#) वाढीव महिना - Intercalaris Mensis (27)
३) मार्च - Mensis Martius (31)
४) एप्रिल - Mensis Aprilis (29)
५) मे - Mensis Maius (31)
६) जून - Mensis Iunius (29)
७) जुलै - Mensis Quinctilis (31)
८) ऑगस्ट - Mensis Sextilis (29)
९) सप्टेंबर - Mensis September (29)
१०) ऑक्टोबर - Mensis October (31)
११) नोव्हेंबर - Mensis November (29)
१२) डिसेंबर - Mensis December (29)
वर्षाचे एकूण दिवस - ३५५
लिप वर्षाचे एकूण दिवस - ३८२
क - ४) ज्युलियन कालगणना -
रोमन सम्राट ज्युलिअस सीझर व ऑगस्टस यांनी मूळ ग्रीक कालगणनेमध्ये बदल करून सुधारीत ज्युलियन कालगणना तयार केली आणि त्याच्या नावाचं 'ज्युलियन कॅलेंडर' तयार केलं. त्या मुळच्या कालगणनेमधील दोन महिन्यांची Quinctilis आणि Sextilis ही दोन नावे बदलून त्यांना आपली 'जुलै' आणि 'ऑगस्ट' अशी नावे दिली. पूर्वीच्या कॕलेंडरमधे या जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे प्रत्येकी ३० दिवस होते. ज्युलियस सिझर व ऑगस्टस यांनी आपल्या नावांच्या महिन्यात आपले श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी त्यात प्रत्येकी एक दिवस वाढवून घेतला आणि जुलै व ऑगस्ट महिन्यांचे प्रत्येकी ३१ दिवस केले. त्यानंतर प्रत्येक महिन्याला ३१-३० दिवस धरून ३६५ दिवसांचे वर्ष बनवले. मुळच्या कालगणनेत फेब्रुवारी हा ३० दिवसांचा महिना होता. त्यामुळे वाढवलेल्या दिवसांचे गणित जमवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातून दोन दिवस कमी केले व फेब्रुवारीचे (३०-२=२८) असे दिवस झाले. त्यानंतर पुढे लीप वर्षांच्या वेळी त्याला एक दिवस वाढवून दिला व त्याचे एकोणतीस दिवस केले (२८+१=२९). असे हे परिपूर्ण सर्व दृष्टीने चांगले असे नवे ज्युलियन कॅलेंडर तयार झाले. नंतर या कालगणनेला कालांतराने पूर्वीची सर्व रोमन नावे बदलून त्या जागी इंग्रजी भाषेतील प्रतिशब्द दिले गेले व त्यांचे नवीन स्वरूप आत्ता आपण वापरतोय तसे झाले. ही कालगणना सौरमानाची आहे. सर्व युरोपीयन आणि ख्रिश्चन राष्ट्रात ही कालगणनेची पद्धती कित्येक शतके चालू होती. या पद्धतीच्या गणितात सौरमानाच्या सुक्ष्म गणिताने दरवर्षी अगदी थोडा फरक पडत होता. त्यामुळे कित्येक शतकांनी हा फरक बराच वाढला आणि त्यात सुधारणेची गरज भासू लागली.
शेवटी इसवीसन ७७/७८ दिलंय याचं कारण म्हणजे ब्रिटिश त्यांचे नवीन वर्ष २५ मार्चला सुरू झाल्याचे समजत. त्यामुळे नवीन वर्षाचे ०१ जानेवारी ते २४ मार्च तारखेपर्यंतच्या पत्रांत इसवीसन देताना गत व चालू असा जोड सनांचा उल्लेख करून लिहित. जसे वर दिलेल्या पत्रात १६७७/७८ आहे तसे. अशावेळी पत्राचा सन म्हणजे १६७७ हा चालू आणि १६७८ हा दुसरा आकडा म्हणजे नंतरचा धरावा लागतो. पण ही पध्दती ब्रिटिशांनी ग्रेगोरियन कालगणना स्विकारल्यानंतर म्हणजे १७५२ नंतर बंद केली आणि इतर देशांप्रमाणे ते ०१ जानेवारीला नवीन वर्षारंभ मानू लागले.
हे ज्युलीयन कालगणनेनुसार १६ जानेवारी १६७७/७८ ला लिहिलेले पत्र आहे. संपूर्ण पत्र तुम्हाला माझ्या ब्लॉगमधल्या 'छत्रपती शिवाजी महाराज - सीझर की जगज्जेता अलेक्झांडर' या लेखात वाचायला मिळेल. |
शेवटी इसवीसन ७७/७८ दिलंय याचं कारण म्हणजे ब्रिटिश त्यांचे नवीन वर्ष २५ मार्चला सुरू झाल्याचे समजत. त्यामुळे नवीन वर्षाचे ०१ जानेवारी ते २४ मार्च तारखेपर्यंतच्या पत्रांत इसवीसन देताना गत व चालू असा जोड सनांचा उल्लेख करून लिहित. जसे वर दिलेल्या पत्रात १६७७/७८ आहे तसे. अशावेळी पत्राचा सन म्हणजे १६७७ हा चालू आणि १६७८ हा दुसरा आकडा म्हणजे नंतरचा धरावा लागतो. पण ही पध्दती ब्रिटिशांनी ग्रेगोरियन कालगणना स्विकारल्यानंतर म्हणजे १७५२ नंतर बंद केली आणि इतर देशांप्रमाणे ते ०१ जानेवारीला नवीन वर्षारंभ मानू लागले.
क - ५) ग्रेगोरीयन कालगणना -
बऱ्याच शतकानंतर या कालगणनेमधे ख्रिस्ती पंचांगाप्रमाणे या ज्युलियन कालगणनेत दहा दिवसांचे अंतर पडल्याचे लक्षात आले. अर्थात पूर्वीच्या कालगणनेत वेळेचा अगदी थोडाच फरक असल्याने हा फरक इसवीसन सोळाव्या शतकात लक्षात आला. त्यामुळे ख्रिस्ती पंचांगात चुका होऊ लागल्या. कालगणनेच्या या ज्युलियन पद्धतीत सुधारणा करण्याचे बरीच वर्ष प्रयत्न सुरू होते. शेवटी या ज्युलियन कॅलेंडरमधल्या त्रुटी सुधारण्याचे ख्रिश्चन धर्मगुरू ग्रेगरी पोप यांनी ठरवले. त्या दूर करण्यासाठी त्यांनी इ.स. १५८२ मधे पूर्वीच्या रोमन कॅलेंडरमधे आमुलाग्र बदल केले आणि त्यानुसार त्यांनी असं जाहीर करून टाकलं की इ.स. ०४ ऑक्टोबर १५८२ या तारखेनंतर ०५ ऑक्टोबर ही तारीख न येता त्यात दहा दिवस मिळवून थेट १५ ऑक्टोबर ही तारीख येईल. १५ ऑक्टोबरपासून कुणीही जुलिअन कॅलेंडरचा वापर न करता सर्वांनी त्यांच्या ग्रेगरी या नावानी ओळखल्या जाणार्या 'ग्रेगोरीअन कॅलेंडर' चा वापर करावा. स्पेन, पोर्तुगिज आणि इटलीच्या बर्याच भागाने या ग्रेगोरीयन पद्धतीचा स्विकार लगेचच केला तर फ्रान्सने डिसेंबर १५८२ मधे केला. स्वित्झर्लंड, नेदरर्लंड आणि जर्मनीतील रोमन कॅथलिक लोकांनी इ.स. १५८३ मधे ही नवीन पद्धत स्विकारली. पोलंडने इ.स. १५८६ त आणि हंगेरीने इ.स. १५८७ त वापरायला सुरूवात केली. हॉलंड, डेन्मार्क, जर्मनीतील प्रोटेस्टंट लोकांनी आणि स्वित्झर्लंडने अनुक्रमे इ.स. १७०० त आणि इ.स. १७०१ मधे नवीन पद्धती घेतली. स्कॉटलंडमधे इ.स. १६०० त आणि स्वीडनने इ.स. १७५३ मधे नवीन पद्धती चालू केली. तोपर्यंत या नवीन पद्धतीचा स्विकार न केलेल्या ग्रेट ब्रिटनला नंतरच्या काळात जगासोबत चालण्यासाठी याविषयी नमतं घ्यावंच लागलं आणि तब्बल १७० वर्षांनी म्हणजे इ.स. १७५१ ला ब्रिटीश पार्लमेंटमध्ये हा बदल करण्याचा कायदा संमत झाला. त्यानंतर ०२ सप्टेंबर १७५२ ला १४ सप्टेंबर १७५२ समजून त्यांनी नवीन पद्धतीचा अवलंब केला.
# सौरमान आणि चांद्रमान म्हणजे काय?
चांद्रमान किंवा चांद्रमास म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास लागणारा काळ. असे बारा चांद्रमास म्हणजे एक चांद्रवर्ष. हिजरी कालगणनेत तारीख लिहिताना त्याआधी 'छ' लिहिण्याची पद्धत आहे. हिंदू चैत्र आणि मुसलमानी मोहरम वगैरे महिने चांद्रमानाचे म्हणजे २९.५ दिवसांचा एक महिना या पद्धतीचे असतात, पण वर्षे बहुधा सौरमानाची म्हणजेच ३६५.२५ दिवसांचे एक वर्ष या पद्धतीची असतात. फक्त हिजरी वर्ष मात्र २९.५ x १२ = ३५४ दिवसांचे असते. चैत्र वगैरे गणनेत महिने जरी चांद्रमानाचे असले तरी दर अडीच वर्षांनी एक अधिक मास धरला जातो त्यामुळे त्याचे वर्षाचे सरासरी मान ३६५.२५ दिवसांचे म्हणजे सौरमानाचेच होते. मोहरम आदी गणनेत अधीक महिना धरत नाहीत त्यामुळे त्याचा सौरमानाचा मेळ जमत नाही. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू एका वर्षात येत नाहीत. हा मेळ साधण्यासाठी हिजरी सनात चांद्रमान गणना पद्धती सोडून सौरमान पद्धती स्विकारावी लागली. आपल्या नेहमीच्या वापरातला इसवीसन हा सौरमान पद्धतीत असतो. सुहूर आणि फसली सनाची सुरूवात सौरमान पद्धतीची असल्यामुळे त्याची सुरूवात इंग्रजी तारखेशी बरोबर जुळते.
आपण सध्या ग्रेगोरीयन कॅलेंडरचा वापर रोजच्या वापरात करतो पण जुन्या मराठी कागदपत्रातले उल्लेख इसवीसनात केलेले नसतात. ज्याने पत्र लिहिलंय, तो वापरत असलेल्या कालगणनेत त्यांच्या तारखा असतात. त्यामुळे कागदपत्रावरची तारीख शालिवाहन शके, राज्याभिषेक शक, सुहूर, फसली किंवा हिजरीच्या आकड्यात लिहिलेली आढळून येते. इसवीसन आणि शालिवाहन शके यात ७८-७९ वर्षांचे, फसली सनात ५९०-५९१ वर्षांचे, हिजरीत ५८४-५८५ वर्षांचे, अरबी सुहूरमधे ५९९-६०० वर्षांचे, राज्याभिषेक शकात १६७४-१६७५ वर्षांचे, विक्रम संहतमधे ५५-५६ वर्षांचे अंतर असते. सध्या इसवीसन २०२० सुरू आहे. मग आजच्या तारखेला प्रत्येक कालगणनेचे कोणते वर्ष सुरू असेल?
मग जर का आज इसवीसन ०२ मे २०२० सुरू असेल तर...
१) विक्रम संहत (विरोधीकृत नाम संवत्सर) - २०७६-७७
२) शालिवाहन शके (शार्वरी नाम संवत्सर) - १९४१-४२
३) राज्याभिषेक शके - ३४६-४७
४) हिजरी सन - १४३६-३७
५) फसली सन - १४२९-३०
६) अरबी सुहूर - १४२०-२१ (इहीदे अशरीन आर्बामया व अलफ)
७) तेरीख-इ-इलाही - ४६४-६५
८) जुलुस -
८ - अ) अकबर - ४३६-३७
८ - आ) जहांगीर - ४१५-१६
८ - इ) शाहजहान - ३९२-९३
८ - ई) औंरगजेब - ३६३-६४
वरील सनावळ्या केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत आणि त्याच्या कालगणनेत थोडाफार फरक पडू शकतो.
माझ्या या लेखात दिलेली माहिती परिपूर्ण नक्कीच नाही. त्याचप्रमाणे कालगणना समजावी यासाठी जास्तीतजास्त पत्रे आणि उतारे देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही जशी पत्रे/उतारे मिळतील तसे ते इथे देऊन ही लेखमाला अद्ययावत करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल. खरं सांगायचं तर बरेच मुद्दे या लेखमालेत केवळ विस्तारभयावह घेता आलेले नाहीत. याशिवाय हे देखील सांगू इच्छितो की या प्रस्तुत लेखात असणारी माहिती शंभर टक्के बरोबरच आहे असंही मला अजिबात म्हणायचं नाही. ही लेखमाला ऐतिहासिक दस्तऐवज वाचताना त्या दस्तऐवजाच्या 'काळाची' तोंडओळख आणि आवड निर्माण व्हावी केवळ याचकरिता लिहिलेली आहे. दस्तऐवजाचा नेमका दिवस कळण्यासाठी बारकाईने गणितच करावे लागेल किंवा जंत्री तरी पहावी लागेल.
माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणीवा राहून गेल्या असण्याची नक्कीच शक्यता आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी सर्वस्वीपणे माझीच आहे. माझ्यातल्या चुकांना, उणीवांना वाचक मोठ्या मनाने क्षमा करतीलच आणि या विषयातील जाणकार त्यावर नक्की प्रकाश टाकून, माझ्या ज्ञानात भरच घालतील याची मला खात्री आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या बहुमोल माहितीच्या आधारावर सदर लेखात योग्य त्या दुरूस्त्या करण्याची माझी पुर्ण तयारी आहे. बहुत काय लिहिणें, अगत्य असू द्यावे. लेखनसीमा.
शेवटी समर्थ रामदासांचा एक श्लोक सांगून थांबतो.
सावधचित्ते शोधावे,
शोधोनी अचूक वेचावे,
वेचोनी उपयोगावे,
ज्ञान काही ||
समाप्त.
संदर्भ -
१) खरे जंत्री - गणेश सखाराम खरे
२) मोडक जंत्री - बाळाजी प्रभाकर मोडक
३) ऐतिहासिक पत्रबोध - गोविंद सखाराम सरदेसाई
४) साधन चिकित्सा - वासुदेव सीताराम बेंद्रे
५) साधन परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
६) इतिहास मित्र अॅप
७) संशोधकाचा मित्र
८) लोकसत्ता लेख
९) ज्योतिर्मयूख - गोविंद रामचंद्र मोघे
फोटो स्त्रोत -
१) गुगल
२) महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास
३) जेधे शकावली
४) English Factory Records on Shivaji
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा