"छत्रपती शिवराय - एक यशस्वी अर्थकारणी"
-- उत्तरार्ध पहिला --
या लेखाचा पूर्वार्ध वाचला नसेल तर वाचा या धाग्यावर
https://watvedilip.blogspot.com/2019/08/blog-post_23.html
शहाजीराजांनी ज्या दादाजी कोंडदेवांना मुतालिक म्हणून नेमलं होतं ते आदिलशहाच्या वतीने कोंढाण्याचे नामजाद सुभेदारही होते. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे १६४७ साली कोंढाणा ताब्यात घेऊन शिवाजीराजांच्या कारकीर्दीची खरी सुरूवात झाली. त्यानंतर मग तोरणा ऊर्फ प्रचंडगड, पुरंदर, चाकण असा यशाचा आलेख उंचावतच गेला. इ.स. १६४७ ते इ.स. १६८० म्हणजे उणीपुरी ३३ वर्षेच त्यांच्या खर्या कारकीर्दीची म्हणता येतील. या ३३ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक चढउतार येऊनही त्यांनी त्यांच्या पश्चात स्वराज्यासाठी काय शिल्लक ठेवलं हे कृष्णाजी अनंत सभासदाने लिहून ठेवलंय. हा सभासद म्हणजे महाराजांचा समकालीन. त्यामुळेच त्याच्या दस्तऐवजाची विश्वासार्हता नक्कीच वाढते. या कृष्णाजी अनंत सभासदाने राजाराम महाराजांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेचच शिवचरित्र लिहलं. जे 'सभासद बखर' म्हणून सर्वांना परिचित आहे. या बखरीत सभासदाने शेवटी 'स्वराज्याची मोजदाद' नावाचे एक प्रकरण दिलेलं आहे ज्यात त्यांनी स्वराज्याच्या मालमत्तेची यादी दिलेली आहे.
स्वराज्याची मोजदाद
अठरा कारखाने
१) खजीना२) जव्हाहीरखाना - रत्नशाला
३) अंबारखाना - धान्यशाला
४) शरबतखाना -वैद्यशाला/पानकादिस्थानम
५) तोफखाना - यंत्रशाला
६) दफ्तरखाना - लेखनशाला
७) जामदारखाना - वनसागर
८) जिरातखाना - शस्त्रागार
९) मुदबखखाना - मुदपाकखाना/पाकशाला
१०) उष्टरखाना - उंटशाला
११) नगारखाना - दुंदुभीशाला
१२) तालिमखाना - मल्लशाला
१३) पीलखाना - गजशाला/हत्तीगृह
१४) फरासखाना - शिबीरशाला/अस्तरणागार
१५) आबदारखाना - अंदारखाना/जलशाला
१६) शिकारखाना - खाटकशाला/पक्षीशाला
१७) दारूखाना - अग्न्यस्त्रसंग्रह
१८) शहतखाना
बारा महाल
१) पोते - कोशागार२) सौदागीर - सौदागीरी महाल - व्यापारवृद्धी व आयात-निर्यात हेतुप्रित्यर्थ उभारलेली इमारत
३) पालखी - शिबिका
४) कोठी - तुरूंग
५) इमारत - बांधकाम व्यवस्था पाहणार्या खात्याची इमारत
६) वाहिली - रथशाला
७) पागा - घोडे व अश्वशालेचे व्यवस्थापन पाहणारे इमारतवजा बांधकाम
८) सेरी - आरामगृह
९) दारूनी - दारूणी महाल - अंतर्भाग/खाजगीतील जागा, राणीवसा
१०) थट्टी - गौशाळा
११) टंकसाल - नाणी बनवण्याची जागा
१२) छबीना - रात्रीरक्षण
खजीना नाणेंवार व कापड जिन्नसवार बी ll
सुवर्ण ---------------------------नाणे१) १००००० - गंबार एक लक्ष
२) २००००० - मोहरा दोन लक्ष
३) ३००००० - पुतळ्या तीन लक्ष
४) १३६४५२५ - पातशाही होन
५) १००००० - सतलाम्या एक लक्ष
६) १००००० - इमराम्या एक लक्ष
७) ४००००० - शिवराई होन
८) १५००००० - कावेरी पाक (होन)
९) १२७४६५३ - सणगरी होन
१०) २५४०३० - अच्युतराई होन
११) ३००४५० - देवराई होन
१२) १००४०० - रामचंद्राई होन
१३) १००००० - गुती होन
१४) २००००० - धारवाडी होन
१५) ३००००० फलम नाणेवार
१६) २००००० - प्रखलटी होन
१७) १००००० - पाक व नाईकी होन
१८) ३००००० - आदवणी होन
१९) ५००००० - जडमाल होन
२०) १४०००० - ताडपत्री होन
२१) ५००००० - येळूरी होन
२२) ५०००० - निशाणी होन
२३) ५००००० - रूपये
२४) २००००० - आसरप्या
२५) १०००००० - आबाशा
२६) २५००००० - दाभोळी कबरी
२७) १०००००० - चुली कबरी
२८) ५००००० - बसरी कबरी
२९) विविध सुभेदारांना कर्ज - ३ लक्ष होन
३०) विविध ५४ किल्ल्यावरील हुंडी रक्कम - ३० लक्ष होन
पुरवणी होनांची नांवें (फलम याचे पोटी)
१) अफरजी२) त्रिवाळुरी
३) त्रिमुळी
४) चंदावरी
५) बिलघरी
६) उलफकरी
७) महमदशाई
८) वेळुरी
९) कटेराई
१०) देवजवळी
११) रामनाथपुरी
१२) कुनगोटी
सोने चांदी व इतर धातू
१) सोने - ४ नळी ९ खंडी२) रोकड होन - ५ लाख
३) तांबे - १३ नळी ३ खंडी
४) लोखंडी भांडी - २० खंडी
५) शिश्याची भांडी - ४५० नळी ४५० खंडी
६) मिश्रधातुची भांडी - ४०० नळी ४०० खंडी
७) मुरादी टक्के - ६ लाख
८) चांदी - ४ नळी पावणे ६ खंडी
९) तांबे - २७५ नळी २७५ खंडी
१०) पोलादी ठोकळे - ४० नग
११) १०००००० रूपये - साधे व मीनगारी भांडी नग वजन खंडी ५०
१२) १००००० - साधे सोनें नग कांबी, वजन खंडी १२॥
रत्नांची व जडजवाहीर यादी
( संख्या उपलब्ध नाही, कागदाची उजवी बाजू फाटली आहे)१) वैडूर्ये
२) पैराज
३) पुषकराज
४) हिरे
५) माणिक(लाल माणक्या)
६) पन्ना (हिरवा पाचू)
७) पुखराज(पिवळा पुष्कराज)
८) मोती
९) पोवळे
१०) लसण्या
११) नीलम
१२) गोमेद
१३) रत्नजडीत अंगठ्या
१४) रत्नजडीत कमरबंध
१५) धुकधुकी पदके
१६) मोत्याचे तुरे
१७) शिरपेच
१८) चंद्र-रेखा
१९) शिश-फुल
२०) नाक-बिनी नथनी?)
२१) पंखे (रत्नजडावाचे हातपंखे)
२२) बाजू-बंद
२३) कर्णफुले
२४) तोडा
२५) कांकण
२६) पाटल्या
२७) धेंडी (कर्ण भूषणे)
कापड चोपड
१) मुंगीपैठणी जरीचे कापड - १ लक्ष नग२) दो-पट्टी जरीचे व बिन जरीचे कापड - १ लक्ष नग
३) रेशमी कापड - ४ लक्ष नग
४) शाले व इतर लोकरी कापड - १ लक्ष नग
५) कंबरपट्टे - ५० ठाण
६) किनखाप वेलबुट्टेदर - १ लक्ष ठाण
७) किनखाप साधे - १ लक्ष ठाण
८) किरमिजी रंगाचे वेलबुट्टेदर कापड - १ लक्ष नग
९) पांढरे कागद - ३२००० दस्ते
१०) झर अफशानी कागद (गर्भ रेशमी/सुवर्णगर्भित) - ११००० दस्ते
११) बाळापुरी कागद - २०००० दस्ते
१२) दौलताबादी कागद - २००० दस्ते
१३) कापड जरी व साधे व रंगाचे व खुमास जिन्नसवार छ्पन्न देश व दर्यावरील अजमासे किंमत १०००००००
मसाले
१) लवंग - २० नळी २० खंडी२) जायफळ - ३ खंडी
३) मिरची/तिखट - ३० खंडी
४) केशर - ४ खंडी
५) कस्तुरी - १० खंडी
६) अर्गज (केवडा?) - २ खंडी
७) चंदन - ५० नळी ५० खंडी
८) कृष्णगिरी चंदन - १ खंडी
९) कापूर - ४ खंडी
१०) कोरफड - २ खंडी
११) गुलाल - २० खंडी
१२) रक्तचंदन - २० खंडी
१३) मनुके - १ खंडी
१४) अक्रोड - २ खंडी
१५) खुर्मा (शेवया?) - ३० खंडी
१६) खजुर - ४० खंडी
१७) खोबरे - ५० खंडी
१८) वेलदोडा - इलायची - ३ खंडी
सुगंधी तेले
१) मोगरा (बेलाचे फूल) तेल - ४ खंडी२) सुगंधी राईचे तेल - ४ खंडी
३) चमेली फुलाचे तेल - १ खंडी
४) कोरफडीचे तेल - ३० खंडी
५) नागचंपा-बेल तेल - २ खंडी
६) सुपारी - ७० खंडी
७) गुगुळ - १ खंडी
८) हळकुंड - ५०० खंडी
९) हिरडा - १०० खंडी
१०) बेहेडा - आकडा पुसला गेला आहे
११) चेटकी हिरडा - १००० खंडी
१२) तपकीर - ८००० खंडी
१३) मग्ज रुख सुर्ख (कुंकु?) - ५०००० खंडी
१४) खसखस - १०० खंडी
१५) पारा - २ खंडी
मुदपाकखाना
१) साळीचे तांदुळ - १७००० खंडी२) कोद्रू (हरिक) - २००००० खंडी
३) हरबरा - ५०००० खंडी
४) वाटाणे - १२००० खंडी
५) अख्खा मुग - २५००० खंडी
६) तूर - १००० खंडी
७) मसूर - ५०० खंडी
८) तूप - २५००० खंडी
९) मोहरीचे तेल - ७०००० खंडी
१०) हिंग - ३०००० खंडी
११) सैधव - २७० खंडी
१२) जिरं - २०० खंडी
१३) डिंक - ३०० खंडी
१४) गोपीचंदन - २०० खंडी
१५) सफेद (पांढरे) तीळ - १००० खंडी
१६) हरताळ - १००० खंडी
१७) अभ्रक - १००० खंडी
१८) नीळ - १००० खंडी
१९) गंधक - २०० खंडी
२०) हिंगुळ - ३० खंडी
२१) कायफळ - ५०खंडी
२२) कलंक - २ खंडी
२३) पिंपळी - २ खंडी
२४) (बडी) शेप - २ खंडी
२५) अफू - १०० खंडी
२६) ओवा - १०० खंडी
२७) मध - १०० खंडी
२८) नवसागर - १०० खंडी
२९) लोह चुरा - ९०० खंडी
३०) काळे तीळ - २०० खंडी
३१) रायभोगी भात - १०० खंडी
३२) लाला भात - २०० खंडी
३३) तलीयासरी भात - १०० खंडी
३४) मल्हारी भात - १०० खंडी
३५) खिरी-साळीचा भात - ४०० खंडी
३६) तूरडाळ - २०००० खंडी
३७) मूगडाळ - २०० खंडी
३८) मसूरडाळ -१०० खंडी
३९) साखर - १५०० खंडी
४०) मळी - १६०० खंडी
४१) मीठ - १५०० खंडी
४२) लसूण - ५००० खंडी
४३) कांदा - ३०० खंडी
शिवकालीन पुणेरी खंडीचे माप
१ खंडी = २० पुणेरी मण१ पुणेरी मण = १२.५ किलो
म्हणजेच १ खंडी = २५० किलो
(केवळ अंदाजाकरीता, वरील यादीतील नोंदी या पुणेरी खंडीच्या मापाने केल्या आहेत. हे पुराव्या अभावे खात्रीशीर सांगता येत नाही.)
क्रमशः
वाचा या लेखाचा शेवटचा भाग या धाग्यावर
https://watvedilip.blogspot.com/2019/08/ll.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा