"छत्रपती शिवराय - एक यशस्वी अर्थकारणी"
-- उत्तरार्ध दुसरा --
या लेखाचा पूर्वार्ध वाचला नसेल तर वाचा या धाग्यावर
आणि तसंच लेखाचा पहिला उत्तरार्ध वाचला नसेल तर वाचा या धाग्यावर
शस्त्रागार
१) तलवारी - ३०० नग२) खांडा - २०० नग
३) ऐति - ६०० नग
४) भाले - ४००० नग
५) जमदाड - १००० नग
६) पट्टा - १००० नग
७) ढाल - १३०० नग
८) छर्रे - ११०० नग
९) बाण - ४००० भाते भर
१०) चिलखत - ४००० नग
११) छत्त (चामड्याचे सामान्य चिलखत) - ११०० नग
१२) बनेती (लाकडी टोकदार काठी) - ५००० नग
१३) शिरस्त्राण - ४००० नग
१४) कुर्हाडी/फरश्या - ३००० नग
१५) कुदळी - ११०० नग
१६) थाप्या - ३००० नग
१७) करवत - ५००० नग
१८) दारू - २००००० खंडी
१९) पालख्या - ३००० नग
२०) छत्र्या - १२००० नग
२१) पोहरे - १५०० नग
२२) कापूस - ७००० खंडी
२३) मेण - १३०० खंडी
२४) राळ - १००० खंडी
२५) तोफेचे गोळे - १००००० नग
२६) ढोल - ६०० नग
२७) नगारे - १२०० नग
२८) तुतार्या - ८००० नग
पागा
१) अरबी घोडे - ६००० नग२) तुर्की घोडे - ८००० नग
३) दखनी घोडे - १००० नग
४) घोड्या - ९००० नग
५) इतर घोडी - ७००० नग
६) शिंगरू - १००० नग
७) उंट - ३००० नग
८) हत्ती-हत्तीणी व छावे सुमारे - १२६० नग
९) गायी - १००० नग
१०) बैल - ५००० नग
११) म्हशी - ५००० नग
१२) मेंढ्या - १००० नग
नोंद - ५००० घोडी बारगीर लोकांना पैकी ३००० घोडे व २००० घोड्या तसेच १२५ हत्ती बारगीरांना
घोडे राऊत संख्या पागा सिलेदार १,०५,०००
एक लक्ष पाच हजार तपशील१) हंबीरराव सरनौबत
२) संताजी घोरपडे
३) मानाजी मोरे
४) येसाजी काटकर
५) संताजी जगताप
६) निंबाजी पाटोळे
७) जेतोजी काटकर
८) परसोजी भोसले
९) गणोजी शिरके
१०) बाळोजी काटकर
११) निळोजी काटे
१२) नेतोजी पालकर
१३) तुकोजी निंबाळकर
१४) गोंदजी जगताप
१५) संभाजी हंबीरराव
१६) धनाजी जाधव
१७) शामाखान
१८) वाघोजी शिरके
१९) हरजी निंबाळकर
२०) भवानराव
२१) आनंदराव हशमहजारी
२२) तेलंगराव
२३) रूपाजी भोसले
२४) व्यंकट राऊ खांडकर
२५) खंडोजी जगताप
२६) उदाजी पवार
२७) रामजी काकडे
२८) कृष्णाजी घाडगे
२९) सावजी मोहीते
शिलेदार व मुलखींचे सुभेदार
१) नागोजी बल्लाळ२) गणेश शिवदेव
३) चंदो हिरदेव
४) नेमाजी शिंदे
५) रामाजी भास्कर
६) बयाजी गडदरे
७) बाळाजी निळकंठ
८) हिरोजी शेळके
९) त्रिंबक विठ्ठल
१०) महादजी नारायण
११) बाळोजी शिवतरे
१२) जानराव वाघमारे
१३) संक्रोजी माने
१४) अमरोजी पांढरे
१५) रामाजी जनार्दन
१६) मुढोजी थोरात
१७) कृष्णाजी भांदडे
१८) बहिर्जी वडगरे
१९)चंदो नारायण
२०) खेमणी
२१) खंडोजी आटोळे
२२) राघो बल्लाळ
२३) बळवंतराव देवकाते
२४) बहिरजी घोरपडे
२५) मालोजी थोरात
२६) बाळाजी बहिरव
२७) देवाजी उघडे
२८) गणेश तुकदेव
२९) केरोजी पवार
३०) उचाले
३१) नरसोजी शितोळे
हत्ती-हत्तीणी छावे सुमार १२६०
पाणियातील जहाजें आरमाराचे सरदार
१) दर्यासागर२) इब्रामखान
३) मायनाईक
हशम मावळे सरदार असामी १,००,००० यांचे सरदार
१) येसाजी कंक सरनौबत२) सुर्याजी मालुसरे
३) गणोजी दरेकर
४) मुम्बाजी बेनमणा
५) माल सावंत
६) विठोजी लाड
७) इंद्रोजी गावडे
८) जावजी महानलाग
९) नागोजी प्रल्हाद
१०) पिलाजी गोळे
११) मुधोजी सोनदेव
१२) कृष्णाजी भास्कर
१३) कलधोंडे
१४) हिरोजी मराठे
१५) रामाजी मोरे
१६) हिरोजी भालदार
१७) तुकोजी कडू
१८) राम दळवी
१९) दत्ताजी इडि(तु)लकर
२०) पिलाजी सणस
२१) जावजी पाये
२२) भिकजी दळवी
२३) कोंडजी वडखले
२४) त्रिंबकजी प्रभु
२५) कोंडजी फर्जंद
२६) तानाजी तुंदुसकर
२७) तानसावंत मावळे
२८) महादजी फर्जंद
२९) येसजी दरेकर
३०) बाळाजीराव दरेकर
३१) सोन दळवे
३२) चांगोजी कडू
३३) कोंढाळकर
३४) ढवळेकर
३५) तानसावंत भोसले
गड कोट जंजिरे व देशांतील जंजिरे गड कोट बितपशील
१) कोंढाणा ऊर्फ सिंहगड२) घनगड
३) येलबर्गीगड
४) रांगणा ऊर्फ प्रसिध्दगड
५) लिंगाणा
६) चंदन
७) मसीतवाडे ऊर्फ मानगड
८) जयगड
९) लोहगड
१०) कोट फोंड
११) कोट लावड
१२) रसाळगड
१३) हडसर ऊर्फ पर्वतगड
१४) कोट केचर
१५) सातारागड
१६) परळीगड ऊर्फ सज्जनगड
१७) वल्लभगड
१८) जवळेगड
१९) हरुषगड
२०) कुरडू ऊर्फ मंदरगड
२१) सालोमागड
२२) रोहिडा
२३) मदगिरिगड
२४) जिवधण
२५) कोट मंगळूर
२६) कोपलगड
२७) कोट कुष्ठगी
२८) पन्हाळागड
२९) नौबतगड
३०) कोट सुपे
३१) पुरंदरगड
३२) पाली ऊर्फ सरसगड
३३) अचलागिरीगड
३४) भोरप ऊर्फ सुधागड
३५) कोट आंकोले
३६) पांडवगड
३७) वंदन
३८) कोट शिवेश्वर
३९) खिळणा ऊर्फ विशाळगडा
४०) त्रिंबक ऊर्फ श्रीगड
४१) कोट हलियाळ
४२) बहादूरगड
४३) तानवडा
४४) सालेरीगड
४५) मनोहरगड
४६) अहिवंतगड
४७) ठकरीगड
४८) माहुलीगड
४९) चाउड ऊर्फ प्रसन्नगड
याशिवाय दुसऱ्या प्रतींत नावे सापडतात ती अशी
१) केदारकोट२) कोरागड
३) कासेगड
४) कोलजागड
५) कनकगड
६) कोहीमगड
७) कोठारगड
८) कंकणीगड
९) कृष्णागिरीकोट
१०) कुलागड
११) कैडातकोट
१२) कुडाळकोट
१३) कडवरीगड
१४) कारडीगडा
१५) कोचनागड
१६) कल्याणगड
१७) नागिरीगड
१८) नांदगिरीगड ऊर्फ कल्याण
१९) नळदुर्ग
२०) तरूगड
२१) देवगड
२२) गुणवंतगड
२३) गंधर्वगड ऊर्फ भुजबळ
२४) ढालगड
२५) चंद्रगड
२६) चतुरगड
२७) चा(र)दीगड
२८) रायगड तक्ताची जागा
२९) रत्नगड
३०) राजहंसगड
३१) राजमाचीगडा
३२) हसुरकोट
३३) हेमाद्रीगड
३४) हंसगड
३५) सुधाकरगड
३६) सुंदरगड
३७) सिंधूदुर्ग जंजिरा
३८) सुगाणागड
३९) सबळगड
४०) सामत्रागड
४१) सिंहगड
४२) सज्जनगड
४३) सैरगागड
४४) सुमारगड
४५) येशवंत दुर्ग
४६) व्येंद्रगड
४७) वरूपगड
४८) विंदाविदगड
४९) विश्वासी इश्वरकोट
५०) शरगागड
५१) शेवळगड
५२) माचणागड
५३) मंगलगड
५४) कांगोरी
५५) महीघरगड
५६) महानगड
५७) मानाडगड
५८) मत्तगड
५९) मृगगड
६०) (पिटकड?) महोगड
६१) महीतळीगड
६२) मित्रगड
६३) मकरंदगड
६४) भोरगिरी
६५) भिलवडी
६६) भुजबळगड
६७) भूपाळगड
६८) भद्रगड
६९) प्रचितगड
७०) पराक्रमगड
७१) पाराशरदनाम
७२) पैना(जा)रगड
७३) प्रल्हादगड
७४) पहारगड
७५) बीरकोट
७६) बळराजगड
७७) बाळाकोट
नवे राजियांनी गड वसविले त्यांची नांवनिशीवार सुमारी सुमार १११
१) राजगड चारी माच्या२) तोरणा ऊर्फ प्रचंडगड
३) केळजा
४) वैराटगड
५) कमलगड
६) वर्धनगड
७) प्रतापगड
८) कांगोरी ऊर्फ मंगळगड
९) गहनगड
१०) पताकागड
११) पद्मागड
१२) सुबकरगड
१३) सबलगड
१४) बहिरव ऊर्फ सारंगा
१५) गगनगड ऊर्फ बावडा
१६) सारंगगड
१७) सुरगड
१८) जंजिरे विजयदुर्ग
१९) जंजिरे सिंधुदुर्ग
२०) जंजिरे खांदेरी
२१) पावनगड
२२) पारगड
२३) भिंवगड(भीमगड)
२४) भूधरगड
२५) राजगड
२६) सहन(ज)गड
२७) नाकगडगड
२८) लोणजागड
२९) काचणागड
३०) सिदीचागड
३१) वसंतगड
३२) सुंदरागड
३३) महीमानगड
३४) मच्छंद्रगड
३५) व्यंकटगड
३६) माणिकगड
३७) लोकलगड (कैलोल?)
३८) कोथळागड
३९) श्रीवर्धनगड
४०) कमरगड
४१) वासोटा ऊर्फ व्याघ्रगड
४२) खोलगड
४३) प्रचितगड
४४) प्रौढगड
४५) वनगड
४६) नरगुंदगड ऊर्फ महदूगड
४७) रामदुर्ग ऊर्फ भुजबळ
४८) बालेराजा
४९) अंजनवेली
५०) सरगड
५१) मुरगोड
५२) श्रीमंतगड
५३) गजेंद्रगड
५४) कोट येळूर
५५) कनकाद्रिगड
५६) रवळागड
५७) नाचणागड
५८) रामसेजगड
५९) रूद्रमाळगड
६०) समानगड
६१) वल्लभगड
६२) महीपालगड
६३) मयोरगड ऊर्फ नवलगुंद
६४) पटगड
६५) सोनगड
६६) कुंजरगड
६७) तुंगगड ऊर्फ कठीणगड
६८) महीपतगड
६९) मदनगड
७०) कांगोरीगड
७१) वारूगड
७२) भूषणगड
७३) कोट बोटगीर
७४) कंबलगड
७५) मंगलगड
७६) स्वरूपगड
७७) ढोलागड
७८) मनरंजनगड
७९) बहुलगड
८०) महींद्रगड
८१) रजेगड
८२) बळवंतगड
८३) श्रीगलडवगड
८४) पवित्रगड
८५) कलानिधीगड
८६) गंधर्वगड
८७) सुमनगड
८८) गंभीरगड
८९) मंदरगड
९०) मर्दनगड
९१) दहीगड
९२) मोहनगड
९३) गडागड
९४) वीरगड ऊर्फ घोसाळा
९५) तिकोना ऊर्फ वितंडगड
९६) जंजिरे सुवर्णदुर्ग
९७) जंजिरे रत्नागिरी
९८) राजकोट
९९) सेचणागड
१००) सेवकगड
१०१) कोहजगड
१०२) कठोरगड
१०३) भास्करगड
१०४) कपलगड
१०५) हरिश्चंद्रगड
१०६) जंजिरे कुलाबा
१०७) सिध्दगड
१०८) मंडणगड
कर्नाटक प्रांतीचे गड केले नवे एकूण ll ७९
बितपशील कोल्हार, बाळापूर-वरघाट१) कोल्हार बाळापुर भोर
२) नंदीगड
३) चंदनगड
४) ब्रम्हगड
५) गणेशगड
६) श्रीवर्धनगड
७) वज्रगड
८) मर्दनगड
९) कोट बिदनूर
१०) भास्करगड
११) पिचला ऊर्फ प्रकाशगड
१२) कोट टमकूर
१४) कोट कोलार कदीम
१५) दुर्गमगड
१६) भीमगड
१७) सरसगड
१८) अहिनिजादुर्ग
१९) कट्टरगड
२०) मकरंदगड
२१) बुरवडगड
२२) सोमशंकरगड
२३) हातमलगड
२४) भूमंडणगड
२५) मेज कोल्हारगड
२६) महीपालगड
२७) भीमगडनजीक कपशेरी
२८) बुंदीकोट
२९) कोट एलूर
३०) कैलासगड
३१) महीमंडणगड
३२) अर्जुनगड
३३) अकटीगड
३४) पडवीरगड
३५) भंजनगड
३६) राजगड चंदी
३७) मदोन्मत्तगड चंदी
३८) मुखणे गड कोटवेल
३९) भातुर
४०) पाले कोट
घाटांखाली गड कोट
१) पतनगदनेगड२) जगदेवगड
३) केवळगड
४) गगनगड
५) मदगड
६) कस्तुरीगड
७) रत्नगड
८) प्रबळगड
९) मार्तंडगड
१०) कृष्णागिरी चंदी
११) शारंगगड चंदी
१२) लागगड चंदी
१३) कोट त्रिचंदी
१४) सुदर्शनगड
१५) महाराजगड
१६) कृष्णागिरीगड
१७) रंजनगड
१८) शिदगड
१९) मल्लकार्जुनगड
२०) प्राणगड
२१) कुंजरगड
२२) आरकोटगड
२३) कर्नाटकगड
२४) बिगेवाळुंगड
२५) बहिरवगड
२६) कोट सुमा
२७) मनगड
२८) कोट त्रिकळूर
२९) वेटवल ऊर्फ केमल
३०) विशाळगड
३१) कोट त्रिमळ
३२) चेलगड चंदी
३३) गर्वगड चंदी
३४) कोट दृवणा पाटी
३५) रामगड
३६) चिंताहर कोट
३७) वृघ्घाचल कोट
३८) चवीकोट
३९) निलसाजित गड
४०) यशवंतगड
४१) देवगड
एकंदर गडबेरीज
५० प्रथम, १११ नवे राजियांनी वसविले, ७९ कर्नाटक प्रांतीचे एकूण २४०एणेप्रमाणे आपलें राज्य सालेरी किल्ल्यापासून गोदावरी नदी आलीकडे कुल देश वरघाट तळघाट तुंगभद्रा पावेतों हा एक प्रांत व तुंगभद्रे पलिकडे देखील कोल्हार, बाळापूर, चंदी, येलूर सरद कावेरी पावेतों हा एक प्रांत. असे दोन प्रांत मिळून एक राज्य आहे.
या दोन भागात दिलेल्या यादीवरून सतराव्या शतकातल्या रायगडाच्या वैभवाची नक्कीच कल्पना येईल. सभासद म्हणतो 'राजास व्यथा ज्वराची जाहली. राजा पुण्यश्लोक, कालज्ञान जाणें. विचार पाहतां आयुष्याची मर्यादा झाली असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य भले लोक बोलावून आणिले'. आणि त्यांच्या समोर राजे म्हणतात 'राज्य म्या शिवाजीनें चाळीस हजार होनाचा पुणें महाल होता, त्यावरि एक क्रोड होनांचे राज्य पैदा केले, हे गड कोट व लष्कर पागा ऐसें मेळविलें'.
शिवाजी महाराज पुण्याला आले त्यावेळी त्यांना स्वराज्य उभारणीसाठी शहाजीराजांकडून काय मिळालं? आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वराज्यासाठी मागे काय ठेवलं? याचा या लेखात दिलेल्या उदाहरणांवरून मांडलेला लेखाजोखा महाराजांचं आर्थिक कसोटीवर ताडलेलं कर्तुत्व अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करतो.
एक असा विचार केला की हा आर्थिक विकास होण्यासाठी महाराजांनी काय केलं असेल? महाराज किल्ल्यांवर आणि माणसांवर पाण्यासारखा पैसा खर्च करत असल्याचा उल्लेख ऐतिहासिक साधनांतुन मिळतो पण मग उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ त्यांनी कसा घातला असेल? राज्याचं उत्पन्न वाढावं म्हणून कोणत्या योजना राबवल्या असतील?,कर्जे आणि त्यांची वसूली, करसंकलन, शेतीमालाला हमीभाव, आयात-निर्यात वगैरे विषयी काय धोरण राबविले असेल? या सर्व बाबींचा अभ्यास करून हा 'शिवाजी महाराज पॕटर्न' प्रत्येक राज्याने राबविला तर प्रत्येक राज्याला आणि त्यामुळे आपोआपच देशाला सुगीचे दिवस येतील. नाही का?
समाप्त.
संदर्भ :-
१) कृष्णाजी अनंत सभासद लिखित शिवचरीत्र (सभासद बखर)
२) शककर्ते शिवराय - श्री विजय देशमुख
३) इतिहासाच्या पाऊलखुणा
४) शिवराज-मुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, महाराष्ट्र शासन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा